बीड जिल्ह्यात चाललंय काय? परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं, व्हिडीओ व्हायरल
अजित पवार गट राष्ट्रवादीतील माजी नगरसेविकेच्या मुलाने एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. राष्ट्रवादीतील माजी नगरसेविकेच्या मुलाने कर्माचाऱ्याला केलेल्या मारहाणीचा सगळा प्रसंग हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.
बीड जिल्ह्यातील परळीमधून मारहाणीची एक घटना समोर आली आहे. अजित पवार गट राष्ट्रवादीतील माजी नगरसेविकेच्या मुलाकडून मारहाण करण्यात आली. अजित पवार गट राष्ट्रवादीतील माजी नगरसेविकेच्या मुलाने एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. राष्ट्रवादीतील माजी नगरसेविकेच्या मुलाने कर्माचाऱ्याला केलेल्या मारहाणीचा सगळा प्रसंग हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. घटलेल्या या प्रकारानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या परळीच्या पोलीस ठाण्यात सुरू असल्याची माहिती मिळत आहे. अजीज शेख असं मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादीतील माजी नगरसेविकेच्या मुलाचं नाव असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची चांगलीच चर्चा होत आहे. सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी सरपंच संतोष देशमुख यांची निर्घण हत्या करण्यात आल्याचे समोर आले. या घटनेनंतर संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला असून सामान्य माणसांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात चाललंय काय? असा एकच सवाल सध्या केला जात आहे.