“म्हणून तुमची लंगोट तरी वाचली”, अमोल मिटकरी यांची रामदास कदमांवर बोचरी टीका अन् पलटवार

“म्हणून तुमची लंगोट तरी वाचली”, अमोल मिटकरी यांची रामदास कदमांवर बोचरी टीका अन् पलटवार

| Updated on: Jun 20, 2024 | 3:02 PM

दादा उशिरा आले असते तर हिमालयात जप करायला जावं लागलं असतं, असा जोरदार टोला देखील अमोल मिटकरी यांनी लगावला तर अजित पवार यांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात गे विसरू नका, असं प्रत्युत्तर देखील अमोल मिटकरी यांनी रामदास कदमांना दिलं. बघा काय केला पलटवार?

अजित पवार वेळेत आले म्हणून तुमची लंगोटी तरी वाचली, अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी रामदास कदम यांच्यावर हा जोरदार पलटवार केला आहे. दादा उशिरा आले असते तर हिमालयात जप करायला जावं लागलं असतं, असा जोरदार टोला देखील अमोल मिटकरी यांनी लगावला तर अजित पवार यांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात गे विसरू नका, असं प्रत्युत्तर देखील अमोल मिटकरी यांनी रामदास कदमांना दिलं. अजितदादा थोडे दिवस आले नसते तरी चालले असते, असं वक्तव्य रामदास कदम यांनी केले होते. यावर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रामदास कदम हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना म्हणाले, “फडणवीस साहेब धन्यवाद. मात्र, अजित पवार थोडे दिवस महायुतीत आले नसते तर चालले असते.” अशा शब्दात रामदास कदम यांनी अजित पवार गटाला टोला लगावला होता.

Published on: Jun 20, 2024 03:02 PM