'लंगोट'वरून खेचाखेची, शिंदे गट-अजित पवार गटात शाब्दिक चकमक, एकमेकांची काढली 'लंगोट'

‘लंगोट’वरून खेचाखेची, शिंदे गट-अजित पवार गटात शाब्दिक चकमक, एकमेकांची काढली ‘लंगोट’

| Updated on: Jun 21, 2024 | 11:15 AM

शिंदे गट आणि अजित पवार गटात शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार थोडे उशिरा आले असते तर बरं झालं असतं, असं रामदास कदम शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी म्हणाले. यावरूनच अमोल मिटकरी यांनी आमच्यामुळेच शिंदेंची लंगोट वाचल्याचे म्हटले आहे.

महायुतीतील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर येण्यास सुरूवात झाली आहे. अजित पवार उशिरा आले असते तरी चाललं असतं असं रामदास कदम म्हणाले. त्यानंतर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांची टीका लंगोटपर्यंत पोहोचली. शिंदे गट आणि अजित पवार गटात शाब्दिक चकमक झाल्यानंतर त्यांनी एकमेकांची थेट ‘लंगोट’ काढल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार थोडे उशिरा आले असते तर बरं झालं असतं, असं रामदास कदम शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी म्हणाले. यावरूनच अमोल मिटकरी यांनी आमच्यामुळेच शिंदेंची लंगोट वाचल्याचे म्हटले आहे. आता रामदास कदमांनी लंगोटच्या वक्तव्यावरून अक्षरक्षः चिंध्या फाडल्या आहेत. दादा उशिरा आले असते तर हिमालयात जप करायला जावं लागलं असतं, असा जोरदार टोला देखील अमोल मिटकरी यांनी लगावला तर अजित पवार यांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात गे विसरू नका, असं प्रत्युत्तर देखील अमोल मिटकरी यांनी रामदास कदमांना दिलं.

Published on: Jun 21, 2024 11:15 AM