'पवार साहेब आपसे बैर नही, समरजीत अब तुम्हारी...', हसन मुश्रीफांकडून खुलं आव्हान

‘पवार साहेब आपसे बैर नही, समरजीत अब तुम्हारी…’, हसन मुश्रीफांकडून खुलं आव्हान

| Updated on: Sep 04, 2024 | 3:33 PM

भाजप नेते समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत पवार गटात प्रवेश केला. कागलच्या गैबी चौकात समरजित घाटगे यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा झाला. यानंतर शरद पवारांनी हसन मुश्रीफांवर जोरदार टीका केली. तसेच समरजित घाटगे फक्त आमदार राहणार नसून त्यांना मंत्रिपद सुद्धा देणार असल्याचे शरद पवारांनी म्हटले यावरून हसन मुश्रीफ यांनी निशाणा साधला.

“शरद पवार साहेबांनी कायम प्रजेचा आणि रयतेमधून आलेल्या सामान्य कार्यकर्त्यांचा प्रचार केलेला आहे. राजा विरोधात प्रजा अशी निवडणूक आहे आणि प्रजा कायमच जिंकत असते. मंत्री होण्यासाठी आधी निवडणुकीत निवडून यावे लागतं. मागच्या सहा निवडणुकांमध्ये मी विजय मिळवला आहे. तेव्हा माझ्यासमोर एकापेक्षा एक असे उमेदवार होते. तीन वेळा तिरंगी लढत झाली, तीन वेळा दोघांमध्ये लढत होती, तरीही मी विजय मिळवत आलो आहे”, असे हसन मुश्रीफ म्हणाले. तर जयंत पाटील दोन दिवसांपूर्वी आले, त्यांनी सभा घेतली. काल पवार साहेबांनी सभा घेतली, मला समजत नाही की ते माझ्यासारख्या अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांच्या मागे का लागले आहेत? असा सवाही मुश्रीफ यांनी केला. तर निवडणुकीत शरद पवार आपसे बैर नही, समरजीत अब तुम्हारी खैर नही असे म्हणत हसन मुश्रीफ यांनी खोचक टोला लगावला.

Published on: Sep 04, 2024 03:32 PM