बोल तो वो रहे है? पर शब्द किसके है? अमोल मिटकरींच्या इशाऱ्याला बळ कुणाचं?
अमोल मिटकरी यांनी त्यांच्याच वरिष्ठ नेत्यांनी तीन वेळा सावधपणे बोलण्याचा इशारा दिला. बोल तो वो रहे है... पण शब्द हमारे है... हा थ्री इडियट सिनेमातील डायलॉग तुम्ही ऐकला असेल आता तिच स्थिती महायुतीत अजित दादांच्या प्रवक्त्यांची झाली आहे का? अशी शंका येऊ लागली आहे.
महायुतीत बेबनाव नको, म्हणून अमोल मिटकरी यांनी त्यांच्याच वरिष्ठ नेत्यांनी तीन वेळा सावधपणे बोलण्याचा इशारा दिला. मात्र अमोल मिटकरीकडून महायुतीला इशारा देण्याची परंपरा कायम आहे आणि त्यामुळे विविध चर्चा होत आहेत. बोल तो वो रहे है… पण शब्द हमारे है… हा थ्री इडियट सिनेमातील डायलॉग तुम्ही ऐकला असेल आता तिच स्थिती महायुतीत अजित दादांच्या प्रवक्त्यांची झाली आहे का? अशी शंका येऊ लागली आहे. आण्णा हजारेंचा बोलविता धनी कोण? असा सवाल सूरज चव्हाण यांनी केल्यावर अजित दादांचे नेते त्यावर गप्प राहिले. बारामतीच्या पराभवावर शिंदे किंवा भाजप गटाला दोषी ठरवू नका, असा ताकीद वजा सल्ला अजित पवार यांनी अमोल मिटकरी यांना दिला आहे. त्यानंतर अजित पवारांवर पराभवाचं खापर फोडलं जातंय, यावरही अमोल मिटकरींनी प्रत्युत्तर दिलं. यानंतरही अमोल मिटकरींची टीका सुरूच आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट