Beed Santosh Deshmukh Case : धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
अजित पवार महायुती सरकारच्या पहिल्या सत्रात मात्र निष्प्रत झाल्याचं दिसतं. अजित पवार यांच्या मंत्र्यांवर आरोप होतायत. आरोप करणारे बहुतांश भाजपचे नेते आहेत. पण अजित पवार मौन सोडायला तयार नाहीत.
अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या आरोपांवर अद्याप स्पष्ट भूमिका मांडली नाही. पुरावे नसतील तर राजीनामा नको, अशी भूमिका घेतल्यानंतर विरोधकांनी अजितपवारांसह भाजपच्या भूमिकेवर बोटं ठेवलंय. जर भाजपने केलेल्या सिंचन घोटाळ्याचे पुरावे नव्हते तर अजित पवारांनी राजीनामा का दिला होता? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे. महाविकास आघाडीमध्ये उपमुख्यमंत्री असताना स्वतःभोवती मोठं वलय ठेवण्यात यशस्वी झालेले अजित पवार महायुती सरकारच्या पहिल्या सत्रात मात्र निष्प्रत झाल्याचं दिसतं. अजित पवार यांच्या मंत्र्यांवर आरोप होतायत. आरोप करणारे बहुतांश भाजपचे नेते आहेत. पण अजित पवार मौन सोडायला तयार नाहीत. नाशिकमध्ये छगन भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांचे समर्थक अजित पवार यांच्यावर नाराज आहेत. तर बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करत नाही म्हणून दादांच्या विरोधात तिथेही नाराजी आहे. नाराज भुजबळांवर सात ते आठ दिवसात मार्ग काढू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावर भुजबळांचं मंत्रिपद आमच्या पक्षातील अंतर्गत विषय असल्याचे अजित पवार म्हणाले. अजित पवार बीडमध्ये येऊन कायदा सुव्यवस्था यासंदर्भात परिस्थिती पाहण्याचं आवाहन भाजपच्या धसांनी केलं. त्यावर सुऱेस धसांचा गृहमंत्री फडणवीसांवर विश्वास नाही का? असं उत्तर दादांकडून आलं. तर पुराव्याविना भाजप नेत्यांची टीका अयोग्य असल्याचे म्हणत दादांची तक्रार आहे.