अरेरे, एवढा मोठा करंट?… 440 च्या करंटवर अजित पवार यांची मिश्किल टिप्पणी, बघा व्हिडीओ
VIDEO | अरे काय बोलताय, जरा तारतम्य बाळगा; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रत्युत्तर देताना अजित पवार यांचं मश्किल भाष्य
पुणे : चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात असून लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे झालेल्या रिक्त जागेवर आता पोटनिवडणूक होत आहे. या मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दौरे सुरु केले आहेत. यावेळी प्रचारादरम्यान बोलताना त्यांनी २६ तारखेला इतक्या जोरात बटन दाबा की अजित पवार यांना ४४० चा करंट लागला पाहिजे. पुन्हा त्यांनी चिंचवडचे नाव घेता कामा नये अशी टीका केली होती. यालाच अजित पवार यांच्याकडून चंद्रशेखर बावनकुळे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. अरे बापरे 440 चा करंट म्हणजे मी मरुन जाणार. एवढा मोठा करंट बसल्यावर मी कसा जगू शकतोय. अरेरे, आता माझ्या मतदारांना, माझ्या कार्यकर्त्यांना, सगळ्यांना श्रद्धांजली अर्पण करावी लागेल, अशा शब्दांत अजित पवारांनी खोचक टोला लगावला. अरे काय बोलताय, जरा तारतम्य बाळगा, असा सल्लाही त्यांनी दिला.