संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यावर अजित पवार यांची खोचक प्रतिक्रिया; म्हणाले,’… असंच होणार’
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या त्या वक्तव्यावर अजित पवार यांनी टोला लगावला, बघा काय दिलं प्रत्युत्तर
मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर अज्ञात लोकांनी हल्ला केला आहे. शिवाजी पार्क येथे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना संदीप देशपांडे यांच्यावर काही हल्लेखोरांनी चेहऱ्यावर मास्क लावून लोखंडी रॉड आणि स्टम्पने हल्ला केला. यानंतर त्यांनी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर प्रकृती स्थिर असल्याने देशपांडे यांना डिस्चार्ज देण्यात आला. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केले आहे. सर्वसामान्यांचं सरकार असल्यावर असंच होणार, अशी खोचक प्रतिक्रिया अजित पवार यांनी संदीर देशपांडे यांच्यावरील हल्ल्यावर दिली आहे. बऱ्याचदा भाषणातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनतेला आश्वस्त करताना म्हणतात, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि मुख्यमंत्री देखील सर्वसामान्यांचा आहे. मुख्यमंत्र्यांच्या अशा वक्तव्यावर अजित पवार यांनी हा टोला लगावला आहे.