अजित पवार की युगेंद्र पवार? बारामती कोणाची? विधानसभा निवडणुकीच्या लीडवरुन काका-पुतण्या भिडले

अजित पवार की युगेंद्र पवार? बारामती कोणाची? विधानसभा निवडणुकीच्या लीडवरुन काका-पुतण्या भिडले

| Updated on: Nov 07, 2024 | 5:49 PM

बारामती विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार युगेंद्र पवार हे विधानसभेच्या रिंगणात आहेत. तर महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेसेच उमेदवार अजित पवार हे देखील विधानसभा लढवत आहेत. अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार यंदा अशी चुरशीची लढत होताना पाहायला मिळणार आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघांत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा पवार विरूद्ध पवार असा समाना विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे काका विरूद्ध पुतण्याच्या होणाऱ्या या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार युगेंद्र पवार हे विधानसभेच्या रिंगणात आहेत. तर महायुतीकडून अजित पवार हे निवडणूक लढवणार आहेत. अशातच अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी प्रचारासाठी मैदानात उतरली आहे. त्यामुळे यंदा अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार अशी चुरशीची लढत होताना पाहायला मिळणार आहे. अशातच आता चांगल्या लीडने जिंकून येईन, असा विश्वास अजित पवार यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर कोणत्या गावातून किती लीड मिळतं हे येत्या २३ तारखेला समजेल, असं युगेंद्र पवार म्हणालेत. अजित पवार यांच्या विधानसभा निवडणुकीच्या लीडच्या वक्तव्यावरून युगेंद्र पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. बघा व्हिडीओ काय म्हणाले काका-पुतणे….

Published on: Nov 07, 2024 05:49 PM