Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, रस्त्यावर काचांचा खच; अमोल मिटकरींनी पाठलाग केला अन्...

महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, रस्त्यावर काचांचा खच; अमोल मिटकरींनी पाठलाग केला अन्…

| Updated on: Mar 27, 2025 | 4:29 PM

महामार्गावर क्षमतेपेक्षा जास्त दारूच्या बाटल्यांच्या गोण्या या ट्रकमधून नेल्या जात होत्या. तर या बाटल्या गोणी बाहेर पडू नयेत यासाठी लावण्यात आलेली सुरक्षा जाळी तुटल्यानं वेगानं धावणाऱ्या या ट्रकमधून काही दारुच्या रिकाम्या बाटल्यांनी भरलेली गोणी हायवेवर पडली त्यामुळं संपूर्ण हायवेवर काचांचा खच पडला होता

शिर्डी महामार्गावर ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त दारूच्या बॉटल असल्याचे दिसून आले. या ट्रकमधून मोठ्या प्रमाणात काचेच्या दारूच्या बॉटल्स पडल्यामुळे महामार्गावर काचांचा खच पडल्याचे पाहायला मिळाले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी या ट्रकचा पाठलाग करत दारूच्या बॉटल्स असलेला ट्रक आडवला. आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. ‘वैजापूर जवळ समृद्धी महामार्गावर सायंकाळपर्यंत भीषण अपघात होण्याची दाट शक्यता होती. टोल नाका व सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाची फळ सर्वसामान्य लोकांना भोगावी लागणार?’, असा सवाल अमोल मिटकरी यांनी केला. तर टोलनाक्या बाहेरील पोलीस यंत्रणा व अग्निशमन यंत्रणा कुचकामी असल्याचे म्हणत अमोल मिटकरींनी संताप व्यक्त केला. शिर्डी महामार्गावर एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांनी भरलेल्या गोण्या पडल्याची घटना घडली. या बाटल्या रस्त्यावर पडून फुटल्यानं सर्वत्र काचा पसरल्या होत्या. त्यामुळं महामार्गावर अत्यंत धोकादायक परिस्थिती बनलेली असताना संबंधित ट्रकला अडवण्यासाठी अमोल मिटकरी यांनी पाठलाग केला.

Published on: Mar 27, 2025 04:29 PM