'धरणा'च्या बोचऱ्या टीकेला 'सुपारीबहाद्दर' उत्तर, राज ठाकरेंनी छेडला दादांच्या 'त्या' जुन्या वादग्रस्त विधानाचा वाद

‘धरणा’च्या बोचऱ्या टीकेला ‘सुपारीबहाद्दर’ उत्तर, राज ठाकरेंनी छेडला दादांच्या ‘त्या’ जुन्या वादग्रस्त विधानाचा वाद

| Updated on: Jul 30, 2024 | 10:43 AM

पुण्यातील पूरपरिस्थितीवरून राज ठाकरे यांनी अजित पवारांच्या दहा वर्ष जुन्या वादग्रस्त विधानाचा वाद छेडला. पुण्यात ओढवलेल्या पूरपरिस्थिचा आढावा घेण्यासाठी आलेल्या राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी राज ठाकरेंनी केलेल्या बोचऱ्या टीकेवर राष्ट्रवादीने सुपारीबहाद्दरांनी काय बोलावं? म्हणून राज ठाकरेंना उत्तर दिलंय

पुण्यात अजित पवार नसताना धरणातून पाणी सुटलंय असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना एकप्रकारे डिवचलं आहे. पुण्यातील पूरपरिस्थितीवरून राज ठाकरे यांनी अजित पवारांच्या दहा वर्ष जुन्या वादग्रस्त विधानाचा वाद छेडला. त्यावरून बोचरी टीका होताच राष्ट्रवादीकडून राज ठाकरेंचा उल्लेख सुपारीबहाद्दर असा करण्यात आला आहे. पुण्यात ओढवलेल्या पूरपरिस्थिचा आढावा घेण्यासाठी आलेल्या राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी राज ठाकरेंनी केलेल्या बोचऱ्या टीकेवर राष्ट्रवादीने सुपारीबहाद्दरांनी काय बोलावं? म्हणून राज ठाकरेंना उत्तर दिलंय. ‘राज्याचे एक उपमुख्यमंत्री पुण्याचे… ते त्या ठिकाणी नसतानाही धरणातून पाणी वाहिलंय.’, असा खोचक टोलाच राज ठाकरे यांनी अजित पवार यांना लगावला आहे. तर पुण्यात अचानक पूर आला.. यामध्ये अजित पवार यांनी लक्ष घालायला नको का? असा सवालदेखील राज ठाकरे यांनी अजित पवारांना केला आहे. यावरच राष्ट्रवादीकडून राज ठाकरेंना उत्तर देण्यात आलंय.

Published on: Jul 30, 2024 10:40 AM