अरे बहुत जगह है…अरे नहीं है…. महायुतीच्या नेत्यांची दाटीवाटी अन् विरोधकांकडून टोलेबाजी
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडीओ ट्वीट करून सताधारी आणि भाजपच्या इनकमिंगवर निशाणा साधला. जर केली नसती सुरत गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी या शीर्षकाने हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय
मुंबई, १८ जानेवारी २०२४ : एकीकडे भाजप नेते पुन्हा नेते २०१९ प्रमाणे २०२४ ला निवडणुकीच्या तोंडावर इनकमिंगचा दावा करताय. तर दुसरीकडे एकाच गाडीत दाटीवाटीत बसलेल्या नेत्यांचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडीओ ट्वीट करून सताधारी आणि भाजपच्या इनकमिंगवर निशाणा साधला. जर केली नसती सुरत गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी या शीर्षकाने हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. व्हिडीओमध्ये एका कारमध्ये एकनाथ शिंदे पुढच्या सीटवर बसताय. तर आधीपासूनच चंद्रशेखर बावनकुळे मागे मधल्यासीटवर बसले आहेत. त्यानंतर डाव्या बाजूने देवेंद्र फडणवीस, त्यानंतर अजित पवारही या मागच्या सीटवर बसल्याचे दिसते. तर अजित पवार यांनी नीट बसता यावं म्हणून बावनकुळे पुढे सरकरतात. हे नीट स्थिरावत नाही तर त्यांच्या बाजूला गिरीश महाजन यांची एन्ट्री होते…बघा ही दाटीवाटी नेमकी कशासाठी…?