अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया; म्हणाले, बीबीसीच्या सर्च ऑपरेशनवर आक्षेप नाही पण

अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया; म्हणाले, बीबीसीच्या सर्च ऑपरेशनवर आक्षेप नाही पण

| Updated on: Feb 14, 2023 | 7:36 PM

VIDEO | बीबीसीच्या कारवाईवरून अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले बघा व्हिडीओ

नागपूर : बीबीसीच्या दिल्ली-मुंबई कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकल्यानंतर राजकारणालाही आता आणखी वेग आला आहे. दोन्ही कार्यालये सील करण्यात आली असून तेथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत. बीबीसीने गुजरात दंगलीवर एक डॉक्युमेंटरी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर काही आठवड्यातच हा छापा पडला आहे. या कारवाईनंतर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. बीबीसीच्या मुंबई आणि दिल्ली कार्यालयात इन्कम टॅक्सने हाती घेतलेल्या सर्च ऑपरेशनवर कोणताही आक्षेप नाही, पण लोकशाही असलेल्या देशात माध्यमांचा स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे, आजचं प्रकरण हे सर्च पुरते दिसते, त्यामुळे पुढे काही आला तरच यावर बोलता येईल, असे त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

Published on: Feb 14, 2023 07:36 PM