भाजपकडून दिलेल्या ऑफरवर अशोक चव्हाण म्हणताय, विखे पाटील माझे मित्र पण...

भाजपकडून दिलेल्या ऑफरवर अशोक चव्हाण म्हणताय, विखे पाटील माझे मित्र पण…

| Updated on: Feb 17, 2023 | 2:59 PM

VIDEO | विखे पाटील यांनी दिलेल्या भाजपच्या ऑफरवर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, 'मला दिलेली ऑफर...'

नांदेड : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षांतर्गत वाद अधिक चव्हाट्यावर आल्याच्या चर्चा सुरू होत्या. यादरम्यान, आता काँग्रेसमध्ये काहीही नाही. तुम्ही भाजपात यावं, अशी खुली ऑफर भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना दिली होती. या ऑफरवर नांदेडमध्ये माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्याच्या राजकारणात माझे सगळ्याच पक्षात मित्र आहेत मात्र आमची विचारधारा वेगळी आहे. विखे पाटील हे माझे मित्र आहेत पण त्यांची ऑफर मला अमान्य आहे अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे. विखे यांनी मला दिलेली ही ऑफर पाहता ते माझे मित्र आहेत की शत्रू असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच विखे यांच्या त्या वक्तव्यामागे काँग्रेसमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा हेतू आहे का, अशी शंका मला येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Published on: Feb 17, 2023 02:59 PM