MPSC आयोगाच्या निकालावर बाळासाहेब थोरात म्हणाले, … तर विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागला नसता
VIDEO | MPSC आयोगाच्या निकालानंतर बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया, बघा काय म्हणाले?
मुंबई : एमपीएससी परिक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांची ज्या मागण्या होत्या, त्यासाठी त्यांना संघर्ष करून लढा द्यावा लागला. मात्र या मोठ्या संघर्षानंतर एमपीएससी विद्यार्थ्यांची मागणी आज मान्य झाली. हे सरकार आणि आयोग मोठं असंवेदनशील असल्याचे हे उदाहरण आहे. मात्र या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थ्यांचे आणि आमच्या युवक काँग्रेसच्या सहकाऱ्यांचे मी त्यासाठी अभिनंदन करतो. समजूतदारपणे सरकार आणि एमपीएससी आयोग यांनी ही परिस्थिती हाताळली असती तर चार दिवस युवकांना रस्त्यावर संघर्ष करावा लागला नसता, असे म्हणत MPSC आयोगाच्या निकालानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
Published on: Feb 23, 2023 10:48 PM
Latest Videos