धमक्या देणाऱ्यांना फक्त माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
'लोक दबक्या आवाजात फोन करतात आणि सांगतात आम्हाला फोन आला होता. पण कोण फोन करतं हे मी काही विचारलं नाही कारण, दुसरे के घर में झांकने का शौक नहीं मुझे... पण फक्त एक सांगेन, जो तुम्हाला धमक्या देतो, त्याला फक्त माझा नंबर द्या, कारण...'
दुसरे के घर में झांकने का शौक नहीं मुझे, धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, असं वक्तव्य शरद पवार गटाच्या नेत्या आणि बारामती मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केलंय. सुप्रिया सुळे यांनी आज आपला लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी, शारदाबाई पवारांची नात आहे रडत नाही तर लढते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. पुढे त्यांनी असेही म्हणल्या, ‘लोक दबक्या आवाजात फोन करतात आणि सांगतात आम्हाला फोन आला होता. पण कोण फोन करतं हे मी काही विचारलं नाही कारण, दुसरे के घर में झांकने का शौक नहीं मुझे… पण फक्त एक सांगेन, जो तुम्हाला धमक्या देतो, त्याला फक्त माझा नंबर द्या, कारण…ते ज्यांना घाबरतात दिल्लीत त्यांच्या समोरच आम्ही डंके की चोट पर भाषण करतोय.’, असे म्हणत विरोधकांवर निशाणा साधला तर आम्ही ताकदीने निवडणूक लढणार आहे. यावेळी चिन्ह बदललं पण आम्ही पक्ष चोरला नाही तरी आमचं चिन्ह चोरल गेलं. शारदाबाई पवार यांची मी नात आहे. माझ्या आजीने रडायला नाही लढाईला शिकविले. रामकृष्ण हरी वाजवा तुतारी, असे म्हणत सुप्रिया सुळे यांच्याकडून घोषणाही करण्यात आली.