Aurangabad Election | औरंगाबाद राष्ट्रवादी शहर अध्यक्ष विजय साळवींची उचलबांगडी
राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनं महापालिका निवडणुकांची जोरदार तयारी सुरु केली आहे. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत.
राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनं महापालिका निवडणुकांची जोरदार तयारी सुरु केली आहे. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विजय साळवी यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय घण्यात आला आहे. तर, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी ख्वाजा शरफोउद्दीन यांची नियुक्ती करण्यात आलीय. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीनेही दिला मुस्लीम चेहरा दिला आहे. एमआयएमला रोखण्यासाठी राष्ट्रवादीची नवी मोर्चेबांधणी असल्याचं बोललं जात आहे संघटनात्मक फेरबदल करून निवडणुकांना समोर जाण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे.
Latest Videos