आणखी एका नातवाची आजोबांना साथ, अजितदादांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार शरद पवार गटात जाणार?
अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार हे शरद पवार गटात सामील होणार असल्याची चर्चा होतेय. युगेंद्र पवार यांचा अजून राजकारणात अधिकृत प्रवेश झालेला नाही. पण युगेंद्र पवार यांनी शरद पवार गटात सामील होण्याचे संकेत दिले आहे.
बारामती, २१ फेब्रुवारी २०२४ : अजित पवार यांना बारामतीमध्ये जोरदार धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार हे शरद पवार गटात सामील होणार असल्याची चर्चा होतेय. युगेंद्र पवार यांचा अजून राजकारणात अधिकृत प्रवेश झालेला नाही. पण युगेंद्र पवार यांनी शरद पवार गटात सामील होण्याचे संकेत दिले आहे. हा अजित पवार गटासाठी एक धक्का मानला जातोय. आज बारमतीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यलयात युगेंद्र पवार गेले होते. तिथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. यामुळे युगेंद्र पवार हे राजकारणात येणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, “पूर्वीपासून सामाजिक काम करत आलोय. इथे उपस्थित असलेले अनेक सहकारी पूर्वीपासून माझ्यासोबत काम करतायत. त्यांच्या विनंतीला मान देऊन इथे आलोय” अशी प्रतिक्रिया युगेंद्र पवार यांनी दिली.