अजित पवारांचा पहाटेच्या शपथ विधीबद्दल आधी मोठा गौप्यस्फोट अन् नंतर यू-टर्न, म्हणाले…
२०१९ साली भाजपसोबत सत्तेत जाण्याची ज्या-ज्या चर्चा सुरू होत्या, त्या-त्या वेळी होणाऱ्या चर्चा अन् बैठकीमध्ये गौतम अदानी हे देखील होते, असा गौप्यस्फोट स्वतः अजित पवारांनी केलाय. यावरून विरोधकांनी भाजपला लक्ष्य केलं त्यानतंर अजित पवारांनी केलेल्या दाव्यावर अजित पवारांनीच यू टर्न घेतला.
पहाटेच्या शपथ विधीबद्दल आणखी एका गौप्यस्फोटानं राजकीय वर्तुळात नवी चर्चा रंगली आहे. भाजपसोबत सत्तेत जाण्याच्या बैठकीत अमित शाह, देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्यासह उद्योगपती गौतम अदानी देखील होते, असं अजित पवारांनी वक्तव्य केलं. पण यावरून त्याकाळी होऊ घातलेलं महाविकास आघाडी सरकार पाडण्यात भाजपसोबत गौतम अदानींचा हात होता याची कबुली अजित पवारांनी दिल्याचे महाविकास आघाडीने म्हटलंय. या वादानंतर गौतम अदानी बैठकीत होते असं म्हणणाऱ्या अजित पवारांनी मात्र नंतर माध्यमांशी बोलताना अदानी नव्हते अशी प्रतिक्रिया देत युटर्न घेतल्याचे पाहायला मिळाले. यावरून जर माझ्यामतानुसार, बैठका ठरल्या होत्या तर २०१९ मध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार का टिकलं नाही? त्याविरोधात आम्ही मविआचं सरकार कसं स्थापन केलं? अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. त्याकाळात मी अजित पवारांना घेऊन अदानींना भेटलो होतो. अनेक नेत्यांच्या बैठका झाल्यात. मात्र पहाटेच्या शपथविधीला माझा पाठिंबा नव्हता, असं शरद पवार यांनी म्हटलंय.