Sharad Pawar अन् प्रफुल्ल पटेल यांची नवी दिल्लीत भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
VIDEO | नवी दिल्लीत आज शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेत कॅफेटेरिया येथे भेट झाली. प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्यासोबत भेटीचा फोटो शेअर केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
नवी दिल्ली, १९ सप्टेंबर २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या निमित्ताने नवी दिल्ली येथे गेले असता अजित पवार यांच्या गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांची भेट झाल्याचे समोर आले आहे. राज्यसभेत कॅफेटेरिया येथे आज शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची भेट झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी या देखील उपस्थित होत्या. या सर्वांनी एकत्रित येत फोटो देखील क्लिक केला. हा सर्व नेत्यांचा फोटो प्रफुल्ल पटेल यांनी शेअर केला आहे. प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्या आज झालेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे. प्रफुल्ल पटेल यांनी हा फोटो शेअर करत असे म्हटले की, नवीन संसद भवनातील ऊर्जा दिवस! राज्यसभेचं चेंबर हे एक चमत्कार आहे. हा क्षण आदरणीय शरद पवार साहेबांसोबत शेअर केल्याने तो आणखीनच खास बनला. कॅफेटेरियामध्ये मित्रांसह काही स्नॅक्स आणि सौहार्दाचा आस्वाद घेतला…