शिवसेनेचं ओझं उतरवून ठेवायचा भाजपने केला होता निर्धार; शरद पवारांच्या आत्मचरित्रातून धक्कादायक दावा

शिवसेनेचं ओझं उतरवून ठेवायचा भाजपने केला होता निर्धार; शरद पवारांच्या आत्मचरित्रातून धक्कादायक दावा

| Updated on: Apr 30, 2023 | 1:28 PM

VIDEO | 2019 साली भाजप आणि शिवसेनेतील अंतर का वाढलं? शरद पवार यांनी 'लोक माझे सांगाती' या पुस्तकातून थेट कारणचं सांगितले, बघा नेमंक काय केला दावा

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राचा दुसरा भाग २ मे रोजी सर्वत्र प्रकाशित होणार आहे. या आत्मचरित्रपर पुस्तकातून शरद पवार यांनी मोठे धक्कादायक खुलासे केले आहेत. या खुलाशांमुळे महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. भाजप आणि शिवसेनेतील वाढलेलं अंतर आमच्यासाठी शुभसंकेत होते, असा दावा करत शरद पवार यांनी भाजपला राजकीय वर्चस्वासाठी शिवसेनेचं उच्चाटन करायचं होतं असा दावा या पुस्तकातून केला आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये 2019 मध्ये अंतर का वाढलं? याचं कारण देत असतानाच महाविकास आघाडीच्या जन्माची कथाही शरद पवार यांनी पुस्तकात मांडली आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत यापूर्वी शिवेसना 171 आणि भाजप 117 जागा लढत असे. पण 2019नंतर चित्रं बदललं. 2019मध्ये शिवसेनेने 124 जागा लढल्या. तर भाजपने 164 जागा पदरात पाडून घेतल्या. स्वत: च्या बळावर बहुमत मिळवत शिवसेनेचं ओझं उतरवून ठेवायचं असा चंग अतिआत्मविश्वासात दंग भाजपने बाळगला होता. नारायण राणे हे शिवसेनेच्या दृष्टीने गद्दार. पण भाजपमध्ये विलीन करून घेत सेनेच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं असल्याचाही खुलासाही यामधून केल्याचे सांगितले जात आहे.

Published on: Apr 30, 2023 01:28 PM