शरद पवार केंद्र सरकराने दिलेली Z+ सिक्युरिटी नाकारणार? ‘या’ अटी अमान्य, कारण नेमकं काय?
सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी, दिल्ली पोलीस या बैठकीला हजर होते. या बैठकीत केंद्राकडून देण्यात येणाऱ्या झेड प्लस सुरक्षेबाबत शरद पवार यांनी काही अटी घातल्या आहे. त्यापैकी एक महत्त्वाची अट म्हणजे सुरक्षा यंत्रणांकडून शरद पवार यांची गाडी बदलण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
माजी कृषीमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येणार आहे. शरद पवार यांना शरद पवार यांना Z+ सिक्युरिटी देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला असून शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी ५५ सशस्त्र सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात असणार आहे. मात्र केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या Z+ सिक्युरिटी शरद पवार हे नाकारण्याची शक्यता आहे. शरद पवार यांना केंद्राकडून देण्यात आलेल्या Z+ सिक्युरिटीबाबत त्यांच्यासोबत दिल्लीत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, Z+ सिक्युरिटीमधील काही अटी या शरद पवारांना मान्य नसल्याचे सूत्रांकडून कळतेय. त्यामुळे शरद पवार Z+ सिक्युरिटी ही नाकारू शकतात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे. मात्र ही सुरक्षा शरद पवारांकडून नाकारली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज शरद पवारांची दिल्लीत सुरक्षा यंत्रणांमधील अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत शरद पवारांनी झेड प्लस सुरक्षेमधील काही अटी मान्य नाही, असे यावेळी सांगितलं. त्यामुळेच आता शरद पवार केंद्र सरकार देत असलेली सुरक्षा नाकारणार असल्याचे सांगितले जात आहे.