Sharad Pawar : शरद पवारांकडून RSS चं कौतुक; ‘हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण…’
गेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसचं कौतुक केले आहे. विधानसभेला संघाने केलेल्या प्रचाराचे शरद पवार यांच्याकडून कौतुक कऱण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा दारूण पराभव तर महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाल्याचे पाहायला मिळाले होते. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं अनपेक्षित बहुमत मिळवत आपली सत्ता कायम टिकवली आणि राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन झालं. दरम्यान, गेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसचं कौतुक केले आहे. विधानसभेला संघाने केलेल्या प्रचाराचे शरद पवार यांच्याकडून कौतुक कऱण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विरोधकांना घवघवीत यश मिळवण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचा मोठा वाटा असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. काल झालेल्या पक्षाच्या बैठकीत शरद पवार यांनी हे वक्तव्य केले असल्याची सूत्रांची माहिती आहे. विधानसभा निवडणूक हातचा मळ असल्याचा आम्ही समज केला होता, असं मत पक्षाच्या बैठकीत शरद पवार यांनी व्यक्त केले. इतकंच नाहीतर लोकसभा निवडणुकीत आपल्याला घवघवीत यश मिळाल्याने आपण गाफिल राहिलो असल्याचेही शरद पवार यांनी म्हटलं असल्याचे सूत्रांकडून समजतेय.