Sharad Pawar Resigns : शरद पवार निवृत्तीची घोषणा करताना नेमकं काय म्हणाले?
VIDEO | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, काय केली घोषणा?
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा आज संपन्न झाला. यावेळी आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याचा निर्णय शरद पवार (Sharad Pawar) यांनी जाहीर केला. पुढे ते असेही म्हणाले की, कुठं थांबायचं मला कळतं असे म्हणत शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घोषित केला. यावेळी शरद पवार म्हणाले, ‘मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय आज घेतला. माझे घर काँग्रेसच्या नव्हे तर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे होते. माझे वडील बंधू शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. परंतु त्या काळात महाराष्ट्र निर्मितीच्या चळवळीमुळे आम्ही काँग्रेसच्या जवळ जाऊ लागलो. मी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांकडे आकर्षित झालो. त्यावेळी घरातील वातावरण वेगळे आणि माझे विचार वेगळे झाले.’ असे सुरूवात करत शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचण्याचा प्रवास सांगितला. आणखी शरद पवार नेमकं काय म्हणाले…”