Sharad Pawar : राजकारणातली सर्वात मोठी बातमी, शरद पवार म्हणाले, ‘कुठं थांबायचं मला कळतं’
VIDEO | 'लोक मोझे सांगाती' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात पवारांची मोठी घोषणा, 'राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार'
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा आज संपन्न होतोय. या पुस्तकातून शरद पवार यांनी शिवसेना, भाजप, भाजप-सेना युती याबाबत अत्यंत मोठे गौप्यस्फोट केले आहे. शरद पवार यांच्या या धक्कादायक गौप्यस्फोटामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान, शरद पवार यांनी एक मोठी घोषणा केल्याचे समोर आले. यावेळी आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याचा निर्णय शरद पवार (Sharad Pawar) यांनी जाहीर केला. पुढे ते असेही म्हणाले की, कुठं थांबायचं मला कळतं असे म्हणत शरद पवार यांनी ही मोठी घोषणा केली. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होता. या कार्यक्रमादरम्यान, राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून मी निवृत्त होतोय, अशी घोषणा शरद पवार यांनी करताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी सुरू केली. तुम्हीच आमचे नेते, तुम्ही अध्यक्षपदावरून निवृत्त होऊ नका, अशी भावनिक साद या कार्यकर्ते आणि पदाधिकारी भावनिक झाले तर काहींचे अश्रूही अनावर झाले.