शरद पवार यांचं ‘त्या’ वक्तव्याबाबत अवघ्या पाच तासात यू-टर्न; म्हणाले, ‘मी असं बोललोच नाही’
VIDEO | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील वक्तव्यावर 5 तासात यूटर्न, शरद पवार यांनी अचानक भूमिका का बदलली? बघा काय म्हणाले शरद पवार?
सातारा, २५ ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज सकाळी अजित पवार यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होते. यावेळी शरद पवार म्हणाले, ‘अजित पवार हे आमचे नेते आहेत. राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही.’ मात्र अवघ्या ५ तासात शरद पवार यांनी अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत यु-टर्न घेतला आहे. माध्यमांनी अजित पवार यांना राष्ट्रवादीत पुन्हा संधी देणार का असा सवाल केला असता शरद पवार म्हणाले, ‘एकदा कोणती भूमिका घेतली असेल आणि त्यात बदल केला असले तर ती संधी झाली. एकदा पहाटेचा शपथ विधी झाला होता. दोन लोकांचा हा शपथविधी होता. त्यात आमचेही एक सहभागी होते. त्यावेळी आम्ही निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी माझ्याकडून जे झालं ते योग्य नव्हतं, आता त्या मार्गाने जाणार नाही असं म्हटलं होतं. त्यामुळे त्यांना संधी दिली होती, असं सांगतााच पण संधी मागायची नसते. संधी द्यायची नसते. आमची हीच भूमिका आहे.’, असे शरद पवार म्हणाले. त्यामुळे शरद पवार यांच्या या भुमिकेमुळे अजित पवार यांनी राष्ट्रावादीत पुन्हा प्रवेश मिळणं कठीण असल्याचे सांगितलं जात आहे.

दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला

खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा

‘समृद्धी’वरून प्रवास करताय? आजपासून टोलवाढ, तुमच्या गाडीला किती शुल्क?

धसांना हरणाचं मांस पुरवलं? धसांनी Tv9 शी बोलताना सारंकाही सांगितलं
