Breaking | ठाकरे सरकारमध्ये विकास निधी मिळवण्यात राष्ट्रवादी अव्वल, शिवसेना मागे

Breaking | ठाकरे सरकारमध्ये विकास निधी मिळवण्यात राष्ट्रवादी अव्वल, शिवसेना मागे

| Updated on: Dec 17, 2021 | 12:51 PM

महाविकास आघाडी सरकारमध्ये नंबर दोन असलेली राष्ट्रवादी काँग्रेस निधी मिळवण्यात मात्र अव्वल ठरली आहे आणि ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आहे ती शिवसेना निधी मिळवण्याच्या बाबतीत काँग्रेसच्याही पिछाडीवर असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालंय.

महाविकास आघाडी सरकारमध्ये नंबर दोन असलेली राष्ट्रवादी काँग्रेस निधी मिळवण्यात मात्र अव्वल ठरली आहे आणि ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आहे ती शिवसेना निधी मिळवण्याच्या बाबतीत काँग्रेसच्याही पिछाडीवर असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालंय. विकासनिधी मिळवण्यात शिवसेनेचे युवाप्रमुख आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरण विभागालाही फटका बसला आहे. एका आकडेवारीनुसार शिवसेनेच्या 56 आमदारांना एकूण 55255 कोटी निधी विकासकामांसाठी मिळाला आहे. दुसरीकडे काँग्रेसचे एकूण 43 आमदार असून निधी एक लाख 24 कोटी तर सर्वात पुढे राष्ट्रवादी काँग्रेस 53 आमदारांना निधी 2 लाख 24 हजार411 कोटी मिळाले आहेत. हे आकडे 2020-21 या वर्षात तिन्ही पक्षाला मिळालेल्या निधीचे आहेत. शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद असताना सर्वाधिक जास्त आमदार संख्या असतानाही त्यांच्या वाट्याला आलेला निधी सर्वात कमी आहे. शिवसेनेपेक्षा चौपट जास्त निधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागांना मिळालाय तर शिवसेनेच्या दुप्पट निधी पदरात पाडून घेण्यात काँग्रेसही यशस्वी झालंय.