चर्चा तर होणारचं! नगरसेवकाचं लक्षवेधी कोंबडा आंदोलन; अधिकाऱ्याच्या मागणीवर कोंबडाच फाईलसोबत...

चर्चा तर होणारचं! नगरसेवकाचं लक्षवेधी कोंबडा आंदोलन; अधिकाऱ्याच्या मागणीवर कोंबडाच फाईलसोबत…

| Updated on: Jun 07, 2023 | 7:53 AM

फाईलवर आयुक्तांचा कोंबडा म्हणजेच शेरा पाहिजे असे लेखाधिकारी यानी सांगितले. त्यावर राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी चक्क जिवंत कोंबडा फाईलवर ठेवत अधिकाऱ्यांच्या शेऱ्याकडे लक्ष वेधले.

सांगली : येथील महापालिकेत आज राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आज लक्षवेधी आंदोलन चांगलेच चर्चेत आले. फाईलवर आयुक्तांचा कोंबडा म्हणजेच शेरा पाहिजे असे लेखाधिकारी यानी सांगितले. त्यावर राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी चक्क जिवंत कोंबडा फाईलवर ठेवत अधिकाऱ्यांच्या शेऱ्याकडे लक्ष वेधले. यावेळी मनपा मुख्यालयासमोर योगेंद्र थोरात यांनी फाईलवर कोंबडा ठेवत लक्षवेधी आंदोलन केलं. तसेच लेखा विभागात जाऊन लेखाधिकारी केंबले यांच्या केबिन समोर सुद्धा प्रतीकात्मक कोंबडा आंदोलन केले. यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेस नगरसेवक तोफिक शिकलगार उपस्थित होते. या लक्षवेधी आंदोलनाची सांगली महापालिकेत जोरदार चर्चा सुरू होती.

Published on: Jun 07, 2023 07:53 AM