अजितदादांनी अंग काढलं! Sharad Pawar यांच्यावर उपमुख्यमंत्री Ajit Pawar टीका करणं टाळतायत का?
VIDEO | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेतून अजित पवार यांनी अंग काढलं? शरद पवार यांच्यावर टीकी करणं अजित दादा टाळतायत का?
मुंबई, २८ ऑगस्ट २०२३ | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडच्या सभेत शरद पवार यांच्यावर टीका करणं टाळलं. छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेतून अजित पवार यांनी अंग काढल्याचे पाहायला मिळाले. छगन भुजबळ यांचं भाषण नीट ऐकायला आलं नाही. मात्र संयमानं बोलयला हवं, अजित पवार यांनी पुण्यात असं वक्तव्य केलं. तर पुण्यातील द्राक्ष परिषदेत अजित पवार यांनी शरद पवार यांची स्तुती केली. शरद पवार यांनी नेहमीच शेतकऱ्यांना मदत केली, द्राक्ष परिषदेत अजित पवार यांनी असं वक्तव्य करून त्यांचं कौतुक केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीला आता दोन महिने पूर्ण होत आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्याने कार्यकर्ते देखील संभ्रमात पडले आहेत. अशातच शरद पवार यांनी केलेले ते वक्तव्य आणि आता अजित पवार यांच्याकडून करण्यात आलेलं शरद पवार यांचं कौतुक पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे.