दादा भरसभेत असं काय म्हणाले, आता ६५ वर्षांचा झालोय, बारामतीकरांना मी सोडून वेगळा आमदार मिळाला…
आता बारामतीकरांना मी नाही तर दुसरा आमदार मिळाला पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले. यामुळे अजित पवार आता बारामती विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार नाही, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. बघा नेमकं काय काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार आता बारामती विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार नाही, अशी चर्चा असताना त्यांनी पुन्हा एकदा याचे स्पष्ट संकेत दिलेत. अजित पवार यांनी बारामतीमध्ये बोलताना रविवारी आपल्या मनातील खदखद भरसभेत बोलून दाखवली. ते म्हणाले, झाकली मूठ सव्वालाखाची… आपण पहिल्या दिवसांपासून लाखोंच्या मतांनी निवडून येणारी माणसे आहोत. मी आता ६५ वर्षांचा झालो आहे. मी समाधानी आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. अजित पवार त्यांना थांबवत म्हणाले, ऐका… जेथे पिकते तेथे विकत नाही. तुम्ही लक्षात घ्या… एकदा बारामतीकरांना कोणतरी मी सोडून इतर आमदार मिळाला पाहिजे. मग तुम्ही त्याच्या कारकिर्दीतील आणि माझ्या कारकिर्दीची तुलना करा, असे अजित पवार म्हणाले आणि कार्यकर्त्यांनी एकच गदारोळ केला. पुढे ते असेही म्हणाले, बारामतीकरांना न सांगता सर्व मिळत गेले. न सांगता रस्ते होत गेले. न सांगता पिण्याच्या पाण्याची योजना आली. मेडिकल कॉलेज न मागता मिळले. आयुर्वेदीक कॉलेज मिळाले. सध्या बारामती शहर सोडून इतर मतदार संघात ७५०कोटींची कामे चालू असल्याचे सांगितले.