दादांच्या मनात खेद की दबावतंत्र?  बारामतीतच अजित पवारांना धाकधूक नेमकी कशाची?

दादांच्या मनात खेद की दबावतंत्र? बारामतीतच अजित पवारांना धाकधूक नेमकी कशाची?

| Updated on: Sep 09, 2024 | 10:30 AM

2019 ला ज्या बारामतीत अजित पवारांनी लाखोंच्या मताधिक्क्यानं जिंकून रेकॉर्ड बनवला होता. त्याच बारामतीत आगामी निवडणुकीत लढण्याबद्दल अजित पवार चाचपणी करत आहेत का अशी चर्चा सुरुय त्याला अजित पवारांचीच विधानं निमित्त ठरली आहेत.

बारामतीतून अजित पवार लढणार की नाही याबद्दल तेच अजून संभ्रमात आहेत का? अशी चर्चा त्यांच्या विधानानं सुरु झालीय. इतकी कामं करुनही बारामतीकरांनी लोकसभेला वेगळा निर्णय घेतल्याचं म्हणत एकदा मी सोडून बारामतीला दुसरा आमदार मिळायला हवा., असं अजित पवारांनी म्हटलं. त्यानंतर समर्थकांनी गोंधळ घालत अजित पवारांनाच पुन्हा लढण्याचा आग्रह धरला. 2019 च्या विधानसभेत अजित पवार बारामतीत लाखांहून जास्त मतांनी जिंकून आले. महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी जिंकणारे म्हणून अजित पवारांच्या नावे रेकॉर्डही झाला. मात्र यंदा त्याच अजित पवारांनी बारामतीकरांपुढे स्वतःच्याच उमेदवारीबद्दल साशंकता व्यक्त करुन दबावतंत्र अवलंबलं आहे का? याची चर्चा होतेय. कारण लोकसभेला अजित पवारांसोबत भाजप, शिंदेंची शिवसेना आणि सत्तापक्षाची ताकद असूनही बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंना 47 हजार 381 मतांचं लीड मिळालं. याशिवाय भोर, पुरंदर, इंदापूर, दौंड या चार ठिकाणीही सुळेंनाच आघाडी मिळाली. आणि ज्या मतदारसंघात भाजपचे आमदार होते, त्या एकमेव खडकवासल्यात सुनेत्रा पवार आघाडीवर होत्या. त्यामुळे स्वतःच्या हक्काच्याच मतदारसंघात अजित पवार स्वतःच्याच उमेदवारीबद्दल तयार करत असलेला सस्पेन्स चर्चेत आहे.

Published on: Sep 09, 2024 10:30 AM