Pune | पुण्यात राष्ट्रवादीकडून अंधश्रद्धेला खतपाणी? कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर काळी बाहुली

| Updated on: Jul 30, 2021 | 7:17 PM

सांस्कृतिक आणि शैक्षणिक शहर असणाऱ्या पुण्यात एका राजकीय पक्षाच्या कार्यलयाबाहेर काळी बाहुली आणि कोहळ लावल्याची सध्या शहरात चर्चा सुरू आहे. 

पुणे : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला अंधश्रद्धेची बाधा झाली की असा प्रश्न उपस्थित केला जातोय, असा प्रश्न विचारण्यामागचं कारण म्हणजे मागील महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलेल्या पुण्यातील शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर काळी बाहुली कोहळ लावण्यात आलीय. अशा पद्धतीने काळी बाहुली आणि कोहळ लावण्यामागचा हेतू काय आहे हे अद्याप समजू शकलं नाहीय, मात्र सांस्कृतिक आणि शैक्षणिक शहर असणाऱ्या पुण्यात एका राजकीय पक्षाच्या कार्यलयाबाहेर काळी बाहुली आणि कोहळ लावल्याची सध्या शहरात चर्चा सुरू आहे.