मुश्रीफांचं काय होणार? आज अटकेपासून संरक्षण की…? आज निकाल
मुश्रीफ यांचे निकटवर्तीय आणि ब्रिक्स कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड यांना समन्स बजावत आज चौकशीसाठी हजर राहण्यासाठी सांगितलं आहे
मुंबई : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने आपले हात घट्ट केले आहेत. याअनुषंगाने दोन दिवसांपुर्वीच ईडीने पुण्यातील 9 ठिकाणी छापे टाकले आहेत. तर मुश्रीफ यांचे निकटवर्तीय आणि ब्रिक्स कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड यांना समन्स बजावत आज चौकशीसाठी हजर राहण्यासाठी सांगितलं आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यादरम्यान आज त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील निकाल येण्याची शक्यता आहे. तर न्यायालयाने निकाल 5 एप्रिलपर्यंत राखून ठेवला. आज जर निकाल नाही आला तर पुढील आदेश येईपर्यंत मुश्रीफ यांना ईडीच्या कारवाईपासून न्यायालयाने अंतरिम संरक्षण दिले आहे.
Published on: Apr 05, 2023 01:24 PM
Latest Videos

त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले

पिक्चर अभी बाकी है, ऑपरेशन सिंदूरनंतर त्या ट्वीटनं पाकला पुन्हा धडकी

मसुद अझरचं कुटुंब जिथे नेस्तनाभूत झालं, त्या कोटलीमधील फोटो आले समोर

ऑपरेशन सिंदूरचे 3 मोठे शिकार, 5 टॉप कमांडरचा खात्मा, नावासह फोटो समोर
