कोल्हापुरातील काँग्रेसचा बडा नेता ईडीच्या रडारवर; मुश्रीफ प्रकरणाशी काय आहे संबंध?

कोल्हापुरातील काँग्रेसचा बडा नेता ईडीच्या रडारवर; मुश्रीफ प्रकरणाशी काय आहे संबंध?

| Updated on: Apr 05, 2023 | 1:56 PM

मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील आज निकाल येण्याची शक्यता असतानाच आता पुन्हा एकदा जिल्हातील काँग्रेसचा बडा नेता ईडीच्या रडारवर आला आहे

मुंबई : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने कारवाईचा बडगा उगारल्याने कोल्हापूर जिल्ह्यात आधीच धक्क्यात आहे. मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील आज निकाल येण्याची शक्यता असतानाच आता पुन्हा एकदा जिल्हातील काँग्रेसचा बडा नेता ईडीच्या रडारवर आला आहे. ईडीकडून जिल्हातील काँग्रेसचे जेष्ठ नेते आमदार पी. एन. पाटील यांना समन्स पाठवला जाणार आहे. यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पण याच्या आधीच त्यांना फेब्रुवारी महिन्यात ईडीकडून समन्स पाठविण्यात आला होता. मात्र ते हजर राहू शकले नव्हते. आता मात्र ते थेट ईडीच्या कार्यालयात हजर झाले आहेत. मात्र मात्र, आज त्यांची चौकशी करण्यात आली नाही. त्यांना पुन्हा एकदा नव्याने समाज बजावून चौकशीसाठी बोलावलं जाणार आहे.

Published on: Apr 05, 2023 01:55 PM