त्यांचा 100 टक्के करेक्ट कार्यक्रम करू, शिंदे गटाच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल

त्यांचा 100 टक्के करेक्ट कार्यक्रम करू, शिंदे गटाच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Aug 13, 2024 | 12:33 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेतून नाव डिलीट करण्याची धमकी दिली आहे. विधानसभेत विरोधात काम केल्यास लाडकी बहीण योजनेतून नाव डिलीट करी, असे शिंदेंच्या आमदाराने म्हणत धमकीच दिली आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. १५०० रूपये नको तर मराठा आरक्षण द्या, असा मेसेज एका व्यक्तीने महेश शिंदे यांना व्हॉट्सअप केला. दरम्यान, यानंतर योजनेतून तुझं नाव डिलीट करतो, असं म्हणत महेश शिंदे यांनी फोन करून त्या व्यक्तीला चांगलंच सुनावलं आहे. डिसेंबर महिन्यात स्क्रूटिनी कमिटीची बैठक होणार आहे, अशी माहिती महेश शिंदे यांनी दिली. यावेळी कोण पुढे पुढे करत त्यांची यादी तयार करा, त्यांचा करेक्ट कार्यक्रम करूया, असं महेश शिंदे म्हणाले. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी यावर भाष्य केले आहे. ‘आमदारच म्हणताय डिसेंबर महिन्यात स्क्रूटिनी करू, म्हणजे १० लाख अर्ज असतील तर याचे लाख दीड लाख करायला वेळ लावणार नाही.’, असे जयंत पाटील म्हणाले.

Published on: Aug 13, 2024 12:33 PM