पुतळा कोसळल्यानंतर मोदी अन् सरकारच्या माफीनाम्यावरून जयंत पाटील थेट म्हणाले, ‘...ही आमची कधीच मागणी नव्हती’

पुतळा कोसळल्यानंतर मोदी अन् सरकारच्या माफीनाम्यावरून जयंत पाटील थेट म्हणाले, ‘…ही आमची कधीच मागणी नव्हती’

| Updated on: Sep 06, 2024 | 2:26 PM

“शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निमित्ताने हे सरकार प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार करतंय हे सिद्ध झालंय. शिल्पकाराचा अनुभव नव्हता तरीही त्याला पैसे दिले. त्याला फक्त 26 लाख मिळाले. बाकीचे पैसे कुठे गेले? ” TV9 मराठीच्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते यावेळी त्यांनी हल्लाबोल केला.

सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळला. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली तर विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि सरकारने माफी मागावी, अशी मागणी केली. या दुर्घटनेवर सरकार आणि मोदींनी जाहीरपणे माफीही मागितली. मात्र या माफीनंतर विरोधकांकडून ब्लेमगेम केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. यासंदर्भात जयंत पाटील यांना सवाल केल असता ते म्हणाले, ‘आमची माफी मागा ही मागणी नव्हतीच. हा भ्रष्टाचार झालेला आहे. महाराजांचा पुतळा कोसळला. महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला. त्याचं प्रायश्चित सरकारने घेतलं पाहिजे असं आमचं म्हणणं होतं. आता हे माफी मागत फिरत आहेत. पण महाराष्ट्र त्यांना माफी करणार नाही. राज्यातील जनता सर्व गोष्टी सहन करेल, पण महाराजांचा पुतळा पडणं कधीच सहन करणार नाही. त्यातील भ्रष्टाचार कधीच खपवून घेणार नाही. राज्यातील जनता त्यांना कधीच माफी देणार नाही’, ते असेही म्हणाले, माफी मागावी ही आमची कधीच मागणी नव्हती. कारण महाराष्ट्र यांना ऐकणार नाही. हे त्यांना समजलं आहे. त्यामुळे माफी मागत फिरत आहेत. पण जनता त्यांना माफी देणार नाही

Published on: Sep 06, 2024 02:26 PM