'छगन भुजबळ यांची पक्षात गळचेपी, सरकारमध्ये ते राहणार नाही', कुणी केला मोठा दावा?

‘छगन भुजबळ यांची पक्षात गळचेपी, सरकारमध्ये ते राहणार नाही’, कुणी केला मोठा दावा?

| Updated on: Jun 18, 2024 | 5:58 PM

गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अशातच शरदचंद्र पवार पक्षातील एका नेत्यांनं खळबळजनक विधान केले आहे. छगन भुजबळ हे अनेक पदांचे मानकरी होऊ शकले असते. पण त्याबद्दल मला आता बोलायचं नाही. त्यांची पक्षात गळचेपी होतेय म्हणून ते...

छगन भुजबळांची पक्षात गळचेपी होतेय, हे कुणीही नाकारू शकत नाही. छगन भुजबळ आता काय निर्णय घेतील हे मला माहिती नाही, अशी प्रतिक्रिया शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावर जितेंद्र आव्हाड बोलत होते. पुढे जितेंद्र आव्हाड असेही म्हणाले की, छगन भुजबळ हे अनेक पदांचे मानकरी होऊ शकले असते. पण त्याबद्दल मला आता बोलायचं नाही. छगन भुजबळ यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. तो कायम राहणार आहे. त्यांना जर घुसमटल्यासारख वाटतं असेल तर ते नक्की निर्णय घेतील, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. बघा व्हिडीओ नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

Published on: Jun 18, 2024 05:58 PM