‘दादा गुलाबी झाले तरी…’, सभेला येण्यासाठी लोकांना पैसे? अजित पवार यांच्यावर कोणाचा निशाणा?
अजित दादा गुलाबी झाले तरी आणि पैसे देऊन सुद्धा त्यांच्या सभेला लोक येत नाहीत, अशी खोचक टीका ट्विटच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर केली. तर सभेमध्ये येण्यासाठी जनतेला खुलेआम पैसे वाटताना लोकं दिसत असल्याचा गंभीर आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अजित पवार यांच्या एका सभेचा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. पैसे देऊन सभेत लोकं बोलवल्याचा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. अजित पवार यांच्या सभेसाठी आलेल्या लोकांचा एक व्हिडीओ जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत ‘पैसे देऊन वोट घेणे; पैसे देऊन लोकं जमा करणे, ही या सत्ताधाऱ्यांची आता सवय झाली आहे. एकंदरीतच या कारभारामुळे लोकं इतकी वैतागलेली आहेत की ते कशालाच साथ देत नाहीत’, असे म्हटले आहे. पुढे अजित पवार असेही म्हटले की, आता बघा ना, पांढरे कपडे सोडून गुलाबी झालेले अजितदादा यांच्या सभेलासुद्धा लोक येत नाहीत. मग, लोकांना आणण्यासाठी भ्रष्टाचारातून आलेला पैसा वापरलाच पाहिजे. म्हणूनच सभेमध्ये खुलेआम पैसे वाटताना लोकं दिसत आहेत. आता तरी ओळखा, जनतेला तुम्ही केलेली गद्दारी आणि एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणाचा तिटकारा आलाय. म्हणूनच पैसे देऊनसुद्धा लोकं जमत नाहीत’, असा गंभीर आरोपही जितेंद्र आव्हाडांनी केला.