महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील घटनेवर जितेंद्र आव्हाड यांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, ‘हे बळी म्हणजे…’
VIDEO | महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुदैवी घटनेवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं भाष्य, शिंदे-फडणवीस सरकारवर काय केला आरोप
ठाणे : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते खारघर येथे प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात उष्मघातामुळे 50 हून अधिक श्री सदस्यांना त्रास झाला तर उष्माघातामुळे 13 श्रीसदस्यांचा मृत्यू झाला. घटलेल्या या घटनेवर राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. अशातच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘नियोजन शून्य कार्यक्रम. राजकीय महत्वकांक्षा आणि अप्पासाहेब, नानासाहेब धर्माधिकारी यांना पुढे करून त्यांच्या श्रद्धाळू भक्तांना एकत्रित करून आपलं राजकीय गणित जुळवण्यासाठी उतावीळ झालेल्या राजकीय मंडळींनी घेतलेले हे बळी आहेत. 12 वाजेच्या कडक उन्हात काय झालं असेल लोकांचे विचार करा, त्याच्यात बळी गेले. पवार साहेबांची सभा आम्ही आयोजित केल्या, काहींनी बाळासाहेब यांची सभा आयोजित केल्या असतील, काहींनी नरेंद्र मोदींचा सभा आयोजित केल्या असतील या सभा संध्याकाळी 7 वाजता का आयोजित केल्या जातात? राजकीय सभेला कोणीही 12 वाजता येत नाही कितीही प्रेमाने बोलवा येतच नाही. मात्र इथे श्रद्धेपोटी लोक येणार हे ह्यांना माहिती होतं, त्या श्रध्देच्या मार्फत आपलं गणित जुळवता ह्यांनी १२ जणांचे मुडदे पाडले, असा घणाघातही राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.