‘… मी समजावून सांगतो, तुम्ही काळजी करू नका’; अजित पवार पत्रकारांवरच भडकले
VIDEO | संजय राऊत यांच्याबाबतच्या प्रश्नावर अजित पवार यांचं थेट उत्तर, काय म्हणाले बघा?
मुंबई : संजय राऊत मोठे नेते आहेत. ते राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांच्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये. जर माझंच काही म्हणणं नसेल तर तुम्ही का मनावर घेता, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पत्रकारांना म्हणालेत. संजय राऊत यांच्याबाबतच्या प्रश्नावर अजित पवार यांनी असे थेट उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. संजय राऊत यांच्यामुळे जर कार्यकर्त्यांना वाईट वाटत असेल तर त्यांना मी समजावणार असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले. ‘धरणात XXपेक्षा थुंकलेलं कधीही बरं! संयम तर राखला पाहिजे प्रत्येकाने बरोबर आहे. पण ज्याचं जळतं त्याला कळतं. आम्ही भोगतो आहोत आणि आम्ही भोगून सुद्धा जमीनीवर उभे आहोत. इकडे तिकडे पळालो नाही. पक्षाबरोबर आम्ही ठामपणे उभे आहोत. आमच्या मनात पक्ष बदलण्याचा तसंच संकटं येत आहेत म्हणून भाजपसोबत सूत जुळवण्याचा आमच्या मनात विचार सुद्धा येत नाही’, असं संजय राऊत म्हणाले. त्याला अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.