पुण्यात राष्ट्रवादीची ताकद जास्त, लोकसभेची जागा लढवणार? अजित पवार नेमकं काय म्हटले?

पुण्यात राष्ट्रवादीची ताकद जास्त, लोकसभेची जागा लढवणार? अजित पवार नेमकं काय म्हटले?

| Updated on: May 28, 2023 | 11:48 AM

VIDEO | पुण्यातील जागा आधीपासूनच काँग्रेसकडे होती, पण...; अजित पवार यांनी लोकसभेच्या जागांबाबत थेट सांगितलं...

पुणे : गेल्या काही दिवसापूर्वी भाजपचे नेते गिरीश बापट यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर पुण्याची लोकसभेची जागा रिक्त झाली. या जागेवर पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे महाविकास आघाडीतील कोणता पक्ष उमेदवार देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या जागेवर दावा केलाय तर काँग्रेसनेही पुणे लोकसभेच्या जागेवर दावा केलाय. पुण्याची सध्याची स्थिती पाहिली तर कुणाचे आमदार जास्त आहेत, हे पाहिलं पाहिजे. त्यांना पडलेली मतं पाहिली पाहिजेत, असे म्हणत काँग्रेसकडे याआधीपासूनच ही पुण्यातील जागा होती. पण काँग्रेसला ती जागा जिंकता आली नाही, असं अजित पवार म्हणालेत. आम्ही बोलून काहीही उपयोग नाही. तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते बसून याबाबत निर्णय घेतील. आज काँग्रेसने कितीही काहीही म्हटलं तरी आज पुण्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद जास्त असल्याचा पुनरूच्चार अजित पवार यांनी केला.

Published on: May 28, 2023 11:48 AM