‘… मी तर शपथ घेणार, थांबणार नाही’, अजित दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच खळखळून हसले
राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीच्या या तिनही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी अजित पवार यांनी आपल्या खास शैलीमध्ये एकनाथ शिंदे यांची फिरकी घेतल्याचे पाहायला मिळाले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 11 दिवस उलटले. अखेर आज महायुतीच्या नेत्यांनी राजभवनात दाखल होत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. यानंतर यावेळी भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी एकत्रितपणे सत्तास्थापनेचा दावा केला. राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीच्या या तिनही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी अजित पवार यांनी आपल्या खास शैलीमध्ये एकनाथ शिंदे यांची फिरकी घेतल्याचे पाहायला मिळाले. माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या शपथविधीच्या प्रश्नावरून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या जुगलबंदी झाल्याचे पाहायला मिळाले. तर अजित दादांनी टाकलेल्या बाऊन्सरवर एकनाथ शिंदे यांनी जोरदरा सिक्सर मारल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उद्या कोण कोण? शपथ घेणार असा सवाल विचारण्यात आला, या प्रश्नाला अजित पवार यांनी मिष्किलपणे उत्तर देत एकनाथ शिंदे यांची फिरकी घेतली. ‘शिंदेंचं संध्याकाळपर्यंत कळेल, मी तर बुवा काही थांबणार नाही, शपथ घेणारच’असं त्यांनी म्हटलं तर यावर एकनाथ शिंदे म्हणाले, अजित पवारांना सकाळ, दुपार आणि संध्याकाळ असा शपथ घेण्याचा अनुभव आहे. यानंतर एकच हसा पिकला. बघा व्हिडीओ