रात्री तमाशाला गौतमी पाटीलला बोलवा पण…, अजित पवार असं म्हणाले अन्…
VIDEO | रात्री तमाशाला गौतमी पाटील हिला बोलवा, असं अजित पवार का म्हणाले? बघा व्हिडीओ
पुणे : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या रयत पॅनलच्या माध्यमातून जाहीर कार्यकर्ता मेळावा भरवण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना अजित पवार यांनी भर भाषणात उपस्थित कार्यकर्त्यांना मिश्किलपणे भाष्य करत मिश्किल सल्ला दिला. यावेळी अजित पवार म्हणाले, काय त्या यात्रा असतील त्या रात्री काय कापाकापी ती रात्री, तमाशा बघायचा असेल तो रात्री, रात्री तमाशाला गौतमी पाटील या बाईला बोलवा पण दिवसा आवर्जून मतदान करा, अशी मिश्कील टिप्पणी अजित पवार यांनी केली. यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना कृषी बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतदान करण्याचे आवाहन केले. अजित पवार यांनी केलेल्या या वक्तव्याने कार्यकर्ता मेळाव्यातील उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. नेमकं काय म्हणाले अजित पवार