Special Report | थुकरट राजकारणानं संजय राऊत आणि अजित पवार यांच्यात पुन्हा जुंपली
VIDEO | थुंकण्याच्या वादावरून संजय राऊत आणि अजित पवार आमने-सामने, काय केले आरोप-प्रत्यारोप; बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या थुंकण्याच्या प्रकऱणावरून सध्याचं राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच या थुकरट राजकारणावरून संजय राऊत आणि अजित पवार यांच्यात पुन्हा एकदा जुंपल्याचे समोर आले आहे. सत्ताधारी यांच्या टीकेवरून विचारताना संजय राऊत आधी थुंकल्याचे पाहायाला मिळाले आणि नंतर त्यांनी भाष्य केले. त्यानंतर अजित पवार यांनी संजय राऊत यांना तारतम्य बाळगण्याचा सल्ला दिला. यावर राऊत यांनी अजित पवार यांच्या जुन्या विधानाचा दाखला देत प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, संजय राऊत यांच्या या कृत्यानं शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी संजय राऊतांविरोधात जोडे मारो आंदोलन केल्याचेही पाहायला मिळाले. तर काहींनी त्यांच्या अटकेची मागणी केली. तर नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत संजय राऊतच महाविकास आघाडी संपवतील असा इशाराही दिलाय, बघा स्पेशल रिपोर्ट…