तेव्हा दातखीळ बसली होती का?, अजित पवार यांनी आक्रमक होत सरकारला विचारला जाब

तेव्हा दातखीळ बसली होती का?, अजित पवार यांनी आक्रमक होत सरकारला विचारला जाब

| Updated on: Apr 02, 2023 | 9:51 PM

VIDEO | 'या सरकारचा पायगुण चांगला नाही, शिंदे-फडणवीस हे सरकार आलं आणि...', अजित पवार यांचा संभाजीनगरच्या वज्रमूठ सभेत हल्लाबोल

संभाजीनगर : संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. एकीकडे सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा होतेय तर दुसरीकडे भाजप, शिवसेनेच्या वतीने संभाजीनगरमध्ये वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. यावरूनच राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला त्यावेळी यांची दातखीळ बसली होती का? असा थेट सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. तर तत्कालीन राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला. इतकंच नाही तर सरकारमधील काही मंत्र्यांनी, प्रवक्त्यांनी आणि आमदारांनीही बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अपमान केला तेव्हा त्यांची राजकीय बसली होती का, त्यावेळी का गौरव यात्रा काढल्या नाहीत, असा थेट सवाल सरकारला विचारला. सावरकरांसह सर्व महापुरूषांबद्दल आम्हाला आदर आणि अभिमान आहे. तुम्हाला अभिमान असेल तर सावरकरांना भारतरत्न देवून दाखवा, असे आव्हानही अजित पवार यांनी सरकारला दिले आहे.

Published on: Apr 02, 2023 09:42 PM