दुसऱ्यांनी माझं वकीलपत्र घेऊ नये, अजित पवार यांचा कुणाला खोचक टोला?

दुसऱ्यांनी माझं वकीलपत्र घेऊ नये, अजित पवार यांचा कुणाला खोचक टोला?

| Updated on: Jun 04, 2023 | 12:11 PM

VIDEO | अजित पवार यांनी लगावला शिंदे यांच्या शिवसनेतील आमदाराला टोला

नागपूर : अजित पवार युतीमध्ये येण्याच्या तयारी असल्याचे वक्तव्य एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार भरत गोगावले यांनी केलं होतं. या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार म्हणाले, आता ते बोलतात त्याला मी काय करू, माझं सांगायला मी खंबीर आहे ना…दुसऱ्यांनी माझं वकीलपत्र घेऊ नये, माझी भूमिका स्पष्ट असते. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून मी राष्ट्रवादीत काम करतोय. कालही करतोय आजही आणि उद्याही करेल. काही लोकांनी आमची नावं घेतली की, त्याची बातमी होते. आणि माध्यमं ती बातमी चालवता. त्यामुळे ती लोकं असं म्हणतात. तर भरत गोगावले असतील किंवा कुणीही असेल त्यांच्या बातम्यावर विश्वास ठेवू नका, असं अजित पवार यांनी म्हणत अजित गोगावले यांना खोचक टोला लगावला आहे.

Published on: Jun 04, 2023 12:11 PM