राज्यात दंगल घडवण्याचा डाव? अशांततेवरून अजित पवार यांचा गंभीर आरोप

राज्यात दंगल घडवण्याचा डाव? अशांततेवरून अजित पवार यांचा गंभीर आरोप

| Updated on: Jun 07, 2023 | 4:19 PM

VIDEO | कोल्हापुरातील अशांततेवरून अजित पवार यांनी काय केले आरोप?

मुंबई : औरंगाबादमध्ये संदलच्या मिरवणुकीत एक व्यक्ती औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत चालल्या आहेत. आज कोल्हापूरमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टवरुव हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. कोल्हापूरमध्ये जो राडा झाला, त्यासाठी कोण जबाबदार आहे याचा सरकारने शोध घेतला पाहिजे. त्याचा लवकरात लवकर छडा लावावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. तसेच निवडणूका समोर ठेऊन राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. कोल्हापूर हे शांतताप्रिय शहर असून येथे अशांतता निर्माम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचा लवकरात लवकर छडा लावावा, असे ते म्हणाले. तसेच हा राडा, दंगली हाताळण्यासाठी पोलिसांना फ्री हँड द्यावा, त्यांच्या कामात राजकीय हस्तक्षेप करू नये. समाजकंटकांवर कारवाई करण्यास पोलिस सक्षम आहेत, असेही अजित पवार म्हणाले.

Published on: Jun 07, 2023 04:19 PM