Sharad Pawar | शरद पवारांच्या घोषणेनंतर अजित पवार म्हणाले, ‘… तो निर्णय मान्य असेल’
VIDEO | शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेवर अजित पवार आपली पहिली प्रतिक्रिया देत कार्यकर्त्यांनाही सावरले
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा आज संपन्न झाला. यावेळी आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याचा निर्णय शरद पवार (Sharad Pawar) यांनी जाहीर केला. पुढे ते असेही म्हणाले की, कुठं थांबायचं मला कळतं असे म्हणत शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घोषित केला. या घोषणेनंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शरद पवार निर्णय मागे घ्या, अशी विनंती केली. तर या निवृत्तीच्या घोषणेनंतर अजित पवार यांनी आपली पहिली दिली. यावेळी त्यांनी ‘समिती जो निर्णय घेईल तो मान्य’ असे म्हणत कार्यकर्त्यांना आवाहन केले. ‘तुमच्या भावना साहेबांना कळाल्या आहेत. समिती ठरवेल ते शरद पवार यांना मान्य असेल. कमिटी म्हणजे मोठी लोकं नाहीत. परिवारातील सदस्य असतील. मी असेल सुप्रिया सुळे असतील.. तुम्ही भावनिक साथ जी साहेबांना घातली, ती आमच्या लक्षात आली आहे. पण तुम्ही काही अडचण लक्षात घ्या.. कमिटी तुमच्या मनातील योग्य निर्णय घेईल. एवढीच खात्री मी तुम्हाला या निमित्ताने देतो’… असं म्हणत अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना आवाहन केले.