अजित पवार यांनी सोशल मीडियावरून राष्ट्रवादीचं चिन्ह हटवलं, काय आहेत संकेत?
VIDEO | सोशल मीडियावरील अजित पवार यांच्या प्रोफाईलवरून राष्ट्रवादीचा लोगो, कव्हर फोटो नाही..., राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क-वितर्क सुरू
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे 40 आमदारांसमवेत भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. अशातच अजित पवार यांनी आज सकाळपासून त्यांच्या सोशल मीडिया हँडल वरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत असलेले कव्हर फोटो डिलीट केले असून लोगोही हटवल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांच्या ट्विटर आणि फेसबुकवर कव्हर फोटोवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार यांचा फोटो होता. ते फोटो कायमस्वरूपी त्यांनी डिलिट केल्याचे दिसतंय. त्यामुळे अजित पवार यांनी हा इशारा नेमका कुणाला दिला आणि का दिला? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तर अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र त्यांनी असे काही नसल्याचेही स्पष्ट केले होते. मात्र तरी अजित पवारांची अशी कृती सगळ्यांनाच कोड्यात पाडत आहे.