नव्या संसद भवनाच्या लोकार्पणावर अजित पवार यांनी थेट म्हटलं…
VIDEO | एकनाथ शिंदे यांच्या जनता जमालगोटा देईल, या वक्तव्यावर अजित पवार यांचं प्रत्युत्तर
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथील नव्या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात आलं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नव्या संसद भवनाच्या झालेल्या उद्घाटन सोहळ्याला विरोधकांनी बहिष्कार घातला. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नव्या संसद भवनाच्या लोकार्पणावर त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मला प्रश्न विचारताना राज्यापूरते मर्यादित प्रश्न विचारत चला. संसदेचा विषय म्हणाल तर तो देशपातळीवरचा प्रश्न आहे. देशपातळीवरील विरोध पक्षांनी एकत्र येऊन त्याबद्दलचं निर्णय घेतल्याचे मला माध्यमाकडून कळाले. नव्या संसद भवनाचे उद्घाटन हे राष्ट्रपतीच्या हस्ते व्हायला हवं होतं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असल्याने विरोधकांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातला. मात्र खरं कारण राष्ट्रीय पातळीवरील वेगवेगळे नेतेच सांगू शकतील, असे स्पष्टपणे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटले. तर काही लोक विघ्नसंतोषी असतात. अशा कार्यक्रमाला विरोध करणं हा लोकशाहीचा अपमान आहे. त्यांना जी काही पोटदुखी सुटली आहे. जनता त्यांच्या पोटदुखीला चांगला जमाल गोटा देऊन त्यांची पोटदुखी दूर करेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणत विरोधकांवर हल्लाबोल केला होता. त्यावर पवार म्हणाले, जमाल गोटा असं शब्द उल्लेख करणं त्यांना शोभंत काय? जनतेने कर्नाटकात सांगितलं आहे. त्यामुळे जनता ठरवणारच आहे.